Header Ads Widget

राजकीय पुढारी जनतेची दिशाभूल करण्यात एकदम फरफेक्ट घुंगराळा ते बळेगाव रुई रस्त्याचे १३ कोटी हवेत विरले केवळ खेडे बुजविण्याचे काम मात्र जल्द गतीने चालू -

    
      माधव पवार
नायगाव विधानसभा मतदार संघातील असलेल्या घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्त्यासाठी एकूण १३ कोटी मंजूर करण्यात आले असल्याचे नायगाव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार राजेश पवार यांनी जनतेला जाहीर पणे सांगितले होते पपरंतु सदरचे होत असलेले रस्त्याचे काम तेरा कोटी रुपयाचे नसल्याचे सांगण्यात येते 
------------------------------------------------------------------
परंतु तेरा कोटी रुपये हवेत विरले आणि सदरच्या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे जल्द गतीने चालू करण्यात आले असल्यामुळे सदरचे काम करण्यासाठी गुत्तेदार नामदेव पाटील टेबर्णीकर जोरदार यंत्रणा चालू केली असल्यामुळे लवकरच काम पूर्ण होण्याची शक्यता आहेनायगाव तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई बु हा रस्ता गेल्या अनेक वर्षा पासून नादुरुस्त झाला होता परंतु गुत्तेदार पाटील यांच्या माध्यमातून सदरच्या रस्त्या काम दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्यामुळे या पूर्वी सुद्धा अनेक रस्त्याचे कामे  सदरील गुत्तेदारानी कोल्टी बाज कामे करून दाखविले असल्यामुळे याच गुत्तेदाराकडे सदरचे काम देण्यात आले असल्याने लवकर व कोल्टी नुसार करण्यात येणार असल्याचे वास्तव चित्र दिसून येत असून सध्याच्या परिस्थितीत दबई चालू आहे 
सार्वजनिक बांधकाम उप विभाग नायागांवच्या अधिकाऱ्याच्या बेजबाबदार पणामुळे आता पर्यंत रस्त्याचे काम करण्यात आले नसल्यामुळे रस्त्याची चांगली चाळणी होऊन विल्हेवाट लागली होती रस्त्याच्या परिस्थितीत खड्डे बुजविण्याचे काम चालू करण्यात आल्यामुळे नागरिकांना थोडासा रस्त्याच्या बाबतीत दिलासा वाटत असल्याचे सदरील जनतेतून बोलल्या जात असल्यामुळे सदरचे खडे बुजविण्याचे काम गुत्तेदार नामदेव पाटील यांच्या कडे दिल्यामुळे तात्काळ काम चालू करण्यात आले आहे 

Post a Comment

0 Comments