Header Ads Widget

कृष्णूर युनिटच्या हलगर्जी पणामुळे रुई बु येथील वस्तील सिंगल फेजचे डब्बे मिळेनात ? पाण्यासाठी नागरिकांची रानोमाळ भटकंती कनिष्ठ अभियंता असून अडचण नसून खोंळबा !!

    
      माधव पवार
नायगाव तालुक्यातील कृष्णूर युनिट अंतर्गत असलेल्या मौजे रुई बु येथे येथील अधिकाऱ्याच्या हलगर्जी पणामुळे सहाशे ते सातसे वस्तीत राहणाऱ्या नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी गेल्या दोन ते तीन वर्षा पासून विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याना नूतन सिंगल फेजचे डब्बे मिळेत ? नसल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी रानोमाळ भटकंती होताना दिसून येत आहे
तालुक्यातील रुई बु येथील दलित वस्तीच्या नागरिकांची बेहाल होताना दिसून येत असून सिंगल फेजचे डब्बे बंद असल्यामुळे दलित वस्तीला पाणी पुरवठा करणारी ग्रामपंचायतची मोटार बंद असल्यामुळे दलित वस्तीची पाण्या अभावी नागरिकांसाठी वनवास वाडी झाली असल्याचे पाहवयास मिळत आहेकृष्णूर युनिट येथे कार्यकरत असलेले कनिष्ठ अभियंता यांनी देगलूर येथून जुन्ने सिंगल फेजचे आणून बसवीत असल्यामुळे दोन ते तीन दिवसात डब्बे जळून असल्यामुळे डब्बे तात्काळ बसविण्या साठी दिरंगाई करत असल्यामुळे नागरिकांना पाणी आणण्यासाठी रात्रंदिवस फिरावे लागत असून शेतकऱ्यांची थ्री फेजच्या डीपी वरून लाईट जोडून देण्यासाठी सहाय्यक अभियंताना मागणी केली आहेअधिकाऱ्यानी डब्बे नाही तात्काळ बसाविल्या घागर मोर्चाच काढणार ?

सदरच्या सहाय्यक अभियांत्यानी असे सांगितले की गावातील दहा ते १५ शेतकऱ्यांनी सदरचा डीपो शेतकऱ्यांचा असल्यामुळे दलित वस्तीला लाईट जोडू नका असे सांगितल्यामुळे कनेक्शन देऊ शकत नाही सिंगल डीपी आल्यावरच लाईट चालू करण्यात येईल असे सांगितले असून त्यांना संपर्क करून विचारांना करत असतानाचे रेकार्ड सुद्धा उपलब्ध असल्या जर तात्काळ सिंगल फेजचे डब्बे दोन दिवसात नाही बसविल्यास घागर मोर्चा काढणार आहेत

सहाय्यक अभियंता म्हणतात की ग्रामपंचायत कार्यालय जर पैसे भरली असेल तरच एक तास पानी भरण्यासाठी लाईट करण्यात येईल अन्यथा करण्यात येणार नाही त्यांनी असे म्हतात की दलित वस्तीत फक्त साठ घर आहेत परंतु जवळ पास २०० घराची दलित अंधारात असून येथील नागरिकांना पाणी ही पिण्यासाठी मिळत नाही हे मात्र सत्य परिस्थिती आहे


Post a Comment

0 Comments