माधव पवार
प्रशासनाने प्रलंबित मागण्या आज पर्यंत मान्य केले नसल्यामुळे ग्रामसेवक संघटनेच्या वतीने नायगाव पंचायत समितीच्या कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत असल्याची नायगाव ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष टी जी रातोळीकर यांनी नायगाव फास्ट न्यूजचे नायगाव तालुका प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले आहे महाराष्ट्र शासनानी ग्रामसेवकाच्या बाबतीत अतिशय दुर्लक्ष करीत असल्यामुळे त्यांच्या मागण्याकडे आज पर्यंत तरी लक्ष दिले नसल्यामुळे ग्रामसेवकांच्या मागण्या प्रशासनाकडे प्रलंबित आहेत
शासनाने सदर मागण्या मंजूर करत नसल्यामुळे मागण्या शासनाने मान्य करावे या संदर्भात नायगावच्या ग्रामसेवक संघटनेच्या वतीने पंचायत समिती कार्यालया समोर दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे
राज्यातील राज्य सरकार अनेक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या मागण्याची दखल घेऊन सदरच्या मागण्या मान्य करीत असतात परंतु अनेक वर्षापासून ग्रामसेवकाच्या मागण्याचे निवेदन शासनाकडे धूळ खात असताना सुद्धा गंभीर्याने लक्ष देत नाही ग्रामसेवक संघटना चांगली आक्रमक झाली आहे
सदरच्या मागण्या मान्य केले नसल्यामुळे सदरचा संदर्भात या एक दिवशी धरणे आंदोलनात नायगाव तालुक्यातील सर्व ग्रामसेवक कर्मचारी यांनी विशेष सहभागी होऊन धरणे धरणे आंदोलन यशस्वी होत आहे
ग्रामसेवक संघटनेच्या मार्फत अनेक वेळा प्रशासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे
-------------------------------------------------------------------
परंतु कोणत्याच निवेदनाची शासन दखल न घेता प्रशासन झोपेचे सोंग घेऊन ग्रामसेवक या कर्मचाऱ्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे सदरच्या नायगाव पंचायत समिती कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येत असल्याचे सदरच्या ग्रामसेवक संघटनेतून सांगण्यात येत आहे
-------------------------------------------------------------------
महाराष्ट्र प्रशासनाने ग्रामसेवकांच्या मागण्या तात्काळ मान्य करून ग्रामसेवकांना न्याय मिळवून द्यावे अशी मागणी कर्मचाऱ्यासह जनतेतून ही मागणी जोर धरित आहे

0 Comments