Header Ads Widget

नूतन पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांचा नायगांव तालुका मराठी पत्रकार संघा कडून विशेष सत्कार !!

   
    
       माधव पवार
मराठी पञकार परिषद मुंबई संलग्न,नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी गोवर्धन बियाणी यांची नियुक्ती झाल्याने नायगांव तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतिने त्यांची सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन,स्वागत व सत्कार करण्यात आला.

नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकर,माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा,तालुका प्रभारी लक्ष्मणराव मा.भवरे, तालुकाध्यक्ष गजानन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नायगांव तालुक्यातील पत्रकारांनी नुकतीच नवनियुक्त जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांची भेट घेतली आहे
याप्रसंगी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष बियाणी यांनी उपक्रमशील असलेल्या नायगांव तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्य व कर्तव्यतत्परतेचे कौतुक करुन यापूढेही आपण पत्रकारांचे न्याय व हक्क अबाधित ठेवण्यासह सामाजिक भावनेतून विविध उपक्रम राबवावेत सोबतच,एकसंघपणे कार्यरत राहवे असे आवाहन केले.त्याचबरोबर,ग्रामीण अन् शहरातील पत्रकारांसाठी लवकरच नांदेड मध्ये पत्रकार भवनाच्या निर्मितीसाठी प्रशासन व सहकारी यांच्या समन्वयातून आपण प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले आहे

""'जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांचा विशेश सत्कार """

पत्रकारांसाठी कल्याण निधीची निर्मिती व नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पदाधिकारी व सभासद,सदस्य यांच्या गाठी भेटी ही आपण घेणार असल्याचे मत नुतन जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांनी यावेळी व्यक्त केले.
    
याप्रसंगी जेष्ठ पत्रकार गंगाधर पाटील भिलवंडे,माजी तालुकाध्यक्ष व मा.जि.प.सदस्य माणिकराव लोहगावे,प्रभाकर लखपत्रेवार,तालुका कार्याध्यक्ष प्रकाश हणमंते,तालुका सहसचिव रामप्रसाद चन्‍नावार,
लक्ष्मण बरगे,दिलीप वाघमारे, गोंविंद नरसीकर,सुभाष पेरकेवार,गंगाधर गंगासागरे, पंडीत वाघमारे,परमेश्वर जाधव, मनोहर मोरे,यशवंत मोरे,शेषराव कंधारे,निळकंठ जाधव, वाडेकर, अशोक पाटील,श्याम गायकवाड,विरेंद्र डोगरे,शेख अजिम,धम्मा भेदेकर,तानाजी शेळगांवकर. धम्मदीप भद्रे, आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments