Header Ads Widget

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामुळेच विद्युत वितरण लाखो रुपयाच्या तोट्यात ? -

      माधव पवार 
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामुळेच विद्युत वितरण कंपनी लाखो रुपयाच्या तोट्यात असल्याचे अधिकाऱ्याना समजत नसले तरी जनसामान्य माणसाला सरळ सरळ कळत असून ज्या विद्युत वितरण कंपनीच्या मार्फत घरघुती मीटर बसविण्यात आलेल्या विद्युत मीटर धारका कडून रेंडीग घेणाऱ्या व्यक्तीनी जास्तीची अंदाजे रेंडीग टाकून बिलाचा आकडा वाढवित असले तरी सदरच्या ग्रहकांना बिलाचे पैसे भरणे होत नसल्यामुळे अखेर प्रर्याय म्हणून अधिकाऱ्यानी ग्राहकाचे कनेक्शन तोडत आहेत
राज्य विद्युत वितरण कंपनी ही ग्राहकाचे कनेक्शन तोडत असल्यामुळेच तोट्यात येत असून या विभागा कडून हप्तेवारीची सोय नसल्यामुळे सदरचे कनेक्शन तोडल्याच्या नंतर ग्राहक त्यांच्या कडील असलेली रक्कम भरत नसल्यामुळे कंपनी घाट्यात येत असून अशा पद्धतीचे लाखो ग्राहक आहेत विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यानी ग्राहकाचे कनेक्शन तोडण्या ऐवजी त्यांच्या सवलतीच्या दरात बिल भरून घेतले तर आपला ग्राहक टिकून राहतो आणि वसुली हळूहळू होण्यासाठी मदत होतेविद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करीत संबंधित विभागाचे अधिकारी वसुलीसाठी अनेक वेळा प्रयत्न केले असले तरी वाटेल तेवढी वसुली होत नसल्याने अधिकारी व लाईन मेन यांनी निरास होताना दिसून येत असले तरी वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वसुलीचा धसका लागत असल्याने शेतकरी असो की विद्युत मीटर ग्राहक असो यांचे कनेक्शन तोडल्या गेल्यामुळे बिलाची रक्कम भरत नसल्याने अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना कनेक्शन तोडल्या शिवाय पर्याय राहत नसून ग्राहकाकडे असलेली रक्कम कनेक्शन तोडून टाकल्यामुळे सदरची बुडून जात आहे

Post a Comment

0 Comments