Header Ads Widget

माजी आमदार पुत्र भावी आमदार प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसचा विविध बँकांवर दमदार धडक मोर्चा - शाखा अधिकाऱ्याना फुटला घाम !!



    
      माधव पवार
नायगाव विधानसभा युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्याच्या विविध प्रश्नांशी संबंधित आज रोजी नायगाव,उमरी,धर्माबाद तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांच्या विविध अडचणीच्या  प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेल्या नुकसानीचे अनुदान व पिक विम्याची रक्कम बँक खात्यामध्ये जमा झालेली असताना राष्ट्रीयकृत बँकेच्या वतीने बँक खात्यास होल्ड मारून विविध अनुदान  शाखा अधिकाऱ्यानी रोखण्यात आले आहे
नायगाव विधानसभा मतदार संघांचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांचे भावी आमदार सुपुत्र प्रा. रवींद्र उर्फ बंडू पाटील यांच्या निदर्शनास आल्याने युवा नेतृत्व भावी आमदार प्रा.रवींद्र वसंतराव पा.चव्हाण यांच्या नेतृत्वात नायगाव उमरी धर्माबाद येथे युवक काँग्रेसच्या सहकार्याने युवक शेतकऱ्यांच्या समवेत निवेदन देण्यात आले आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या हेखेखोर पद्धतीच्या बोलण्याचा निषेध करण्यात आला आहे या मागणी निवेदनामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेल्या विविध अनुदान स्वरूपी रकमेला होल्ड न करणे, केलेला होल्ड तात्काळ काढणे,पिक कर्ज पुनर्गठन लवकरात लवकर करणे ,खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप आज पर्यंत नसल्याने बँकेच्या शाखाधिकाऱ्यासह सदरच्या यंत्रनेला वाटणीवर आणण्यासाठी भव्य मोर्चा बँकावर धडकला असल्यामुळे शाखाधिकाऱ्याना घाम फुटला असल्याची चर्चा जोरदार चालू आहेशेतकऱ्यांना बँकेत आल्या नंतर चांगल्या दर्जाची वागणूक देणे विविध अनुदाना पोटी जमा झालेली रक्कम कर्जा मध्ये वर्ग करून न घेणे कसल्याच पद्धतीची शेतकऱ्याची अडवणूक न करता त्यांना अनुदान देण्यात यावे अशा विविध प्रलंबित प्रश्न लवकरच लवकर निकाली काढण्यात यावे असे सडेतोड प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी शाखाधिकाऱ्याना सुनावले असून अनेक अडचणी सोडविण्यासाठी युवक काँग्रेसच्या माध्यमातून ठोसपणे बँकेवर धडक मोर्चा काढण्यात आला आहे
बँक शाखा अधिकाऱ्याच्या अनेक त्रासा मुळे शेतकरी वर्ग अडचणीत येत आहे हे बॅंकेच्या व शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात आले यावेळी युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण, श्रीनिवास पाटील चव्हाण, युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक ,लोकप्रतिनिधी व युवक शेतकरी वर्ग आणि ज्येष्ठ शेतकरी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments