Header Ads Widget

राजकारण आणि राजकारणातील राजकीय पुढाऱ्याचे होत असलेले चढउतार व आपलाच माणूस हवा म्हणून राष्ट्रवादीच्या ग्रामीण उपजिल्हाध्याक्ष पदी भास्कर भिलंवडे यांची निवड !!

     माधव पवार
राजकारण आणि राजकारणातील राजकीय पुढाऱ्यांचे होत असलेले चढउतार हे नेहमी राजकीय पुढार्‍यांना राजकारणात अनुभवावे लागते राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे पदभार स्वीकारलेले भास्कर भगवानराव भिलवंडे यांच्या बढीया कामगिरीचा अनुभव वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हृदयात ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दणकट व बळकट करण्यासाठी यशस्वी रित्या काम केलेले भास्कर भिलवंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण उपजिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे
याप्रसंगी राष्ट्रवादीी काँग्रेसचे जिल्हा्हा अध्यक्ष  हरिहरराव भोसीकर यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश
 सरचिटणीस वसंत पाटील सुगावे, जिल्हा सरचिटणीस जांभरुणकर, विक्रम देशमुख, युवक जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, तालुका पक्ष निरीक्षक सुभाष गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी तालुकाध्यक्ष विश्वानाथ बडूरे, युवक अध्यक्ष माधव बेंद्रिकर, सचिव शाम चोंडे, गजानन पवार, माधवराव कोरे, पांडुरंग बागडे, बालाजी शिंदे, साईनाथ बावणे, आदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकारी व पदधिकाऱ्याची विशेष उपस्थिती होती 
आगामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यासाठी अशा निष्ठावंत राजकीय पुढार्‍यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून निवड करण्यात आली असल्याने तमाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यात जल्लोशाचे वातावरण निर्माण झाले आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या आदेशानुसार काम करणारे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासह जयवंत पाटील धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेले राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाउपाध्यक्ष म्हणून भास्करराव भगवानराव पाटील भिलवंडे नरसीकर यांची निवड करण्यात आली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यात उत्साहापक्ष वातावरण पसरले आहे



 



Post a Comment

0 Comments