माधव पवार
नायगाव तालुक्यातील अंतरगाव येथील रहिवासी असलेले व जनसामाने कुटुंबात जन्मास आलेले प्रकाश कडाजी शिंदे यांनी यांनी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने सदरच्या यात्रेत सहभाग घेऊन खासदार राहुल गांधी यांना नांदेड जिल्ह्यातून एकमेव काँग्रेसचा कार्यकर्ता यांनी गुलाबाचा हार घेऊन राहुल गांधी यांना घालून स्वागत करतात तेव्हा अंतरगाव वाशियाचे पांग फिटले असे ही प्रकाश पाटील शिंदे उर्फ गुलाबराव यांनी सांगितले आहे
हा कार्यकर्ता अनेक वर्षापासून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाचे काम करतो योगायोगाने खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा महाराष्ट्रात धडकल्याच्या नंतर सदरचा काँग्रेस कार्यकर्ता हा खासदार राहुल गांधी यांना गुलाबाचा हार घालून स्वागत केले आहेयोगा योगाने प्रकाश कडाजी पाटील शिंदे उर्फ गुलाबराव यांनी खा.राहुल गांधी यांचे स्वागत करण्यासाठी संधी मिळाली असल्यामुळे राज्याची माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मुळेच ही सदरची संधी मिळाली असल्याचे ही प्रकाश पाटील शिंदे यांनी सांगितले असून गांधी यांना गुलाबाचा हार घालून भारत जोडो यात्रेला समर्थन दिले असल्याची ही चर्चा तालुक्यात रंगायला लागली आहेसदरची परंपरा गुलाबाच्या हाराची गेल्या अनेक वर्षा पासून असल्यामुळे हा जिल्ह्यातील एकमेव ग्रामीण कार्यकर्ता काँग्रेसच्या नेत्यांना फक्त इतर फुलाचा हर न घालता गुलाबाचा हार घालूनच काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचे स्वागत करतो आहे
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी प्रकाश पाटील शिंदे उर्फ गुलाबराव नावाने चांगल्या पद्धतीने ओळखत असतात आणि गुलाबाच्या फुलांची चर्चा महाराष्ट्राच्या मंत्रि मंडळात ही अनेक वेळा होताना ऐकावस मिळाली आहे ही संधी न दवडता शिंदे यांनी गुलाबाचा हार का ? घालतो अशी ही चर्चा स्वागत केल्या नंतर जनतेला ऐकावयास मिळते ही स्वाभिमानाची बाब असल्याचे ही जनतेतून प्रतिक्रिया उमटायला लागत आहेत

0 Comments