माधव पवार
नायगाव तालुक्यातील व नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गांवर असलेल्या मौजे घुंगराळा येथे दिनांक ३ ऑक्टोबर २०२२ रोजी संध्याकाळी ठिक सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान प्रख्यात व्याख्यात्या तथा अँडव्होकेट मुक्ताई पवार यांचे भव्य व्याख्यान आयोजित केले आहें
श्री सप्तश्रृंगी सार्वजनिक दुर्गा महोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले आले असून सदरच्या व्याख्याना लाभ घेण्यासाठी भाविक भक्तासह जनतेनी सदरच्या दुर्गा महोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजित श्री सप्तश्रृंगी सार्वजनिक दुर्गा महोत्सवानी केले आहे तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी श्री सप्तश्रृंगी सार्वजनिक दुर्गा महोत्सवाची जयत तयारी करून दुर्गा मातेची स्थापना करण्यात आली आणि या दुर्गा महोत्सवाच्या कात्यक्रमाच्या निमित्ताने गाढ अभ्यासक तथा प्रख्यात व्यख्यात्या त्याच बरोबर अँडव्होकेट मुक्ताई पवार जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड यांचे भव्य असे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहें
सुप्रसिद्ध मुक्ताई पवार यांनी समाज प्रबोधन पर व्याख्याने केले आहेत या पूर्वी नायगाव तालुक्यातील अनेक गावात मॉ जिजाऊचे सुपुत्र शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने रुई बु, कृष्णूर, रुई खुर्द आदी गावात भव्य असे व्याख्याने झाले आहेत
घुंगराळा येथे श्री सप्तश्रृंगी सार्वजनिक दुर्गा महोत्सव मंडळाच्या वतीने रात्री ८ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम ही आयोजित करण्यात आला सदरचा जेवणाचा कार्यक्रम हा दुपारी ४ ते रात्री ८ पर्यंत चालणार असल्यामुळे भाविक भक्तांनी व समस्त गावकऱ्यानी सदरच्या जेवणाचा आस्वाद घ्यावा असे ही कळविण्यात आले आहे

0 Comments