Header Ads Widget

सन १९८५ साली बाळासाहेब ठाकरे यांनी धगधगती मशाल निशाणी घेऊन ७४ नगरसेवक निवडून आणले होते तर २ मार्च १९८५ साली विधानसभेच्या निवडणूकीत छगन भुजबळ विजयी झाले आणि शिवसेनेचे एकमेव आमदार झाले होते -

नायगाव फास्ट न्यूज - माधव पवार -

सन १९८५ साली बाळासाहेब ठाकरे यांनी धगधगती मशाल निशाणी घेऊन ७४ नगरसेवक निवडून आणले होते तर २ मार्च १९८५ साली विधानसभेच्या निवडणूकीत छगन भुजबळ विजयी झाले आणि शिवसेनेचे एकमेव आमदार झाले होते
यापूर्वी देखील धगधगत्या मशालीने घडविला होता इतिहास मशाल ही क्रांतीचे प्रतीक असून शिवसेनाचं असं नात आहे कीं जुन्न तेच सोन याच धगधगत्या माशालीने सन १९८५ स्वा. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर सदरची महापालिकाची निवडणूक लढविण्याचे ठरविले होते त्यावेळी धगधगती मशाल हेच चिन्ह होते

या चिन्हावर शिवसेनेचे एकूण ७४ नगरसेवक निवडून आले आणि शिवसेनेची महापालिकेत सत्ता स्थापन झाली आणि सन २ मार्च १९८५ साली विधानसभेच्या निवडणूकीत छगन भुजबळ विजयी झाले आणि शिवसेनेचे एकमेव आमदार झाले होते
शिवसेनेतील बंडखोरीमुळे शिवसेना पक्षात शिंदे गट आणि उद्धव गट असे  दोन गट पडले असून दोन्ही गटा कडून आमचीच शिवसेना खरी असल्याचे दावे करण्यात आले सदरचा वाद न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या दरबारात गेला असताना निवडणूक आयोगाने शिवसेना नाव शिवसेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवून टाकले असल्यामुळे शिव सैनिकासह जनतेत संताप व्यक्त केला गेला आहे 

त्यांतर दोन्ही गटाला पक्षासाठी तीन नावे आणि तीन चिन्हं देण्याचे निर्देश निवडणूक आयोगने दिले होते दोन्ही गटाने चिन्हं आणि नावं दिल्याच्या नंतर सोमवारी म्हणजे दिनांक १० ऑक्टोबर २०२२ रोजी संध्याकाळी निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला नावं दिले आहे 

 

Post a Comment

0 Comments