हिमायतनगर/- नागोराव शिंदे
तालुक्यातील मंगरूळ येथे आद्यकवी, परमपूज्य, महर्षी. वाल्मिकी ऋषी यांच्ची जयंती आज मोठ्या थाटात साजरी करण्यात आली वाल्मिकी रामायणाचे रचनाकार म्हणून प्रख्यात असलेले ऋषी होते. ते आदिकवि म्हणून प्रसिद्ध आहेत. रामायण एक महाकाव्य आहे
जे प्रभू श्रीराम यांच्या जीवनातुन आपणास जीवनातील सत्य,कर्तव्य,साह्स यांचा परिचय देते आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करते.त्यांनी संस्कृत भाषेत रामायणाची रचना केली.त्यांनी लिहिलेले रामायण हे संस्कृत भाषेतील सर्वप्रथम महाकाव्य मानले जाते.म्हणून वाल्मिकी यांना आद्यकवी असे सुद्धा संबोधले जाते.
वाल्मिकी ऋषी मूलतः वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणात २४,००० श्लोक आणि उत्तर खंड साहित एकूण ७ खंड आहेत.रामायणात भगवान श्रीरामांची गाथा सांगण्यात आली आहे.अश्विन पौर्णिमेला ऋषी वाल्मिकी यांचा जन्म झाला.जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेले वालझरी हे गाव महर्षी वाल्मीकी ऋषींचे जन्मस्थान मानले जाते. अशी सखोल माहिती माहिती मा. संतोष आंबेकर यांनी उपस्थितांना बोलताना सांगितले आहे
यावेळी गावातील सर्वच समाज बांधव मोठ्या उत्साहाने परम पूज्य महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.यावेळी सर्व समाज बांधवांनी यावेळी
उपस्थित मंगरुळ नगरीचे युवासरपंच जीवन जयस्वाल , बंजारा युवा टायगर फोर्स चे तालुकाध्यक्ष दिनेश भाऊ राठोड, संतोष आंबेकर उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, गावातील जेष्ठ मंडळी, माता भगिनी, युवक बांधव, मोठ्या संख्येने उपस्थित होते

0 Comments