Header Ads Widget

बिलोली शहरात चोरीची घटना घडू नये म्हणून पोलीस गस्त वाढवण्याची मागणी -

बिलोली प्रतिनिधी - शंकर पवारे 

बिलोली शहरातील इंदिरा नगर येथे चोरीची घटना घडली शहरात चोरीची घटना घडू नये या साठी गस्त वाढवण्याची मागणी करण्यात आली बिलोली शहरातील राज्य मार्गावारील नर्सी रस्त्यावर देशमुख नगर समोरील पथदिव्य अनेक दिवसा पासुन बंद आसुन रस्ता अंधारमय झाले आहे या कडे नगर परिषद बिलोली लक्ष देण्याची गरज आहे
बिलोली शहरातील  देशमुख नगर ,इंदिरा आवास ,साठे नगर ,आंबेडकर नगर,इंदिरा नगर,  सिद्धार्थ नगर,नवी आबादी, छोटी गल्ली, लोहार गल्ली, कोळी गल्ली, गांधी नगर, नाईकवाडी गल्ली, देशमुख गल्ली, जय माता दी गल्ली व शाळाच्या परिसरात  तसेच शहरात राञी येणाऱ्या नविन व्यक्ती व वाहणांची तपासणी करण्यात यावी, पोलिस गस्त वाढवण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे
सहाय्यक पोलीस निरिक्षक रामदास केंद्रे यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली या वेळी माजी नगराध्यक्ष विजयकुमार कुंचनवार,सामाजिक कार्यकर्ते  इंद्रजीत तुडमे,सय्यद रियाज ,राजकुमार गादगे ,अर्शद देशाई अदि जन उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments