मधुकर जवळे / मारोती कोपलंवाड -
महाराष्ट्रात बरेच विशेष शिक्षक तालुका स्तरावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत परंतु त्यांची आवश्यकता प्रत्येक शाळेवर असुन त्यांच्या स्थायी संदर्भात नियुक्ती अंमलबजावणी करण्या बाबत विचार करण्यात यावा तसेच प्रत्येक शाळेवर किमान एक विशेष शिक्षक व तालुका स्थरावर तिन विशेष तज्ञ स्थायी व कायम नियुक्ती संदर्भात अंमलबजावणी बाबत योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेऊन विचार करण्यात यावा. इतर राज्यात जसे कि त्रिपुरा,राज्यस्थान,दिल्ली येथे विशेष शिक्षकांच्या जागा येतात
राज्य स्वताच्या राज्याची भाषा तसेच इतिहास मागत आहेत यामुळे या राज्यांमध्ये आम्ही पात्र ठरू शकत नाही. सदरील राज्यांन मद्ये सदर पदाकरीता नियुक्ती ची जाहीरात कायम स्वरूपात निघाली असुन महाराष्ट्रात या प्रकरणात महाराष्ट्र राज्याची कुठलीच हालचाल वा कारवाई दिसुन येत नाही या प्रकराणात माहीती असुन सुद्धा शासन कानाडोळा करत आहे.
अशी नम्र विनंती विशेष शिक्षक अविनाश अनेराये यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कडे इमेल द्वारे मागणी केली आहे की यावर जर मुख्यमंत्री यावर अमलबजावणी केलं तर दिव्यांग क्षेत्रातील विशेष शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थाना लवकरात लवकर न्याय मिळेल.

0 Comments