Header Ads Widget

राज्य परिवहन मंडळाच्या बसला उमरखेड ते हदगांव जवळ समोरील टायर फुटल्याने अपघात एक ठार तर तेरा जखमी ? सपोनि प्रशांत देशमुख घटनास्थळी रवाना

       माधव पवार
राज्य परिवहन मंडळाची कंधार डीपीची बस प्रवाशाना घेऊन नागपुर कडे जात असतांना हदगांव ते उमरखेड जवळ बसचा समोर टायर फुटल्याने झालेल्या अपघात एक जन ठार तर तेरा ते चौदा लोक जखमी झाल्याचें समजते सदरची बस ही नागपूर ते तुळजापुर रोडवर असलेल्या मालेगावच्या जवळ पास हा अपघात झाला असल्याचे कळते सदरील बसचा उजव्या बाजूचा टायर फुटला असल्याने बसने याच मार्गा वरून हदगांव कडे जाणार्‍या एका पांढऱ्या रंगाच्या बुलॉरो टेम्पोला धडक दिल्यामुळे यातील पाच जन जखमी झाल्याचे समजते आहे
सदरील घटना ही उमरखेड पोलीस ठाण्याच्या हादीतील असल्याचें सांगण्यात येत असून सदरच्या झालेल्या 
भीषण अपघातात राज्य परिवाहन मंडळाच्या बस मधील प्रवाशी एकूण नऊ प्रवाशी झाल्याचे सांगण्यात येत असून सदरच्या टेम्पो मधील प्रवास करणारा व्यक्ती ठार झाला असल्याचे समजते सदर घटना दिनांक २६ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी अंदाजे साडे चार ते पाच वाजण्याच्या दारण्यान घडली असल्याने राज्य परिवाहन मंडळाच्या बसचा चालकाच्या बाजूने चुराडा झाला असल्याचें चित्र स्पष्ट दिसून येत आहे 
नांदेड जिल्हाच्या कंधार डीपीची राज्य परिवहन मंडळाची  बस क्रमांक एम एच ४० एन ९६३४ उमरखेडला जात होती व हदगांव कडे जात असलेल्या ब्लॉरो टेम्पो क्रमांक एम एच २६ एच ९८२१  ला धडक लागली व झालेल्या भीषण अपघात टेम्पो मधील मजुर संतोष काळबांडे ( ३८ )  हदगांव हा जागीच ठार ? झाल्याचे सांगण्यात आले आहे
सदर अपघाची माहिती कळताच उमरखेड पो स्टे चे  पो उप निरिक्षक प्रशांत देशमुख,अकुंश दरबस्तेवार आणि नरेन्द्र पुंड हे कर्मचारी घटना स्थळी पोहोचले होते  या प्रकरनी ठाणेदार अमोल माळवे अधिक तपास करित आहेत .

राज्य परिवहन मंडळाचे चालक  विठ्ल पुंडे ,वच्छला काळे,जनाबाई काबंळे,कपिल साळवे, मारोती शिंदे, मारोती नरवाडे,रोशणी जामोदकर  सिमा जामोदकर, सविता नरवाडे,परशुराम पांचाळ, जखमी प्रवाशी त्यांच्यावर उमरखेडच्या शासकीय रुग्णालय  उपचार डॉक्टरानी चालू केले आहेत तर काही जखमीना हदगांव येथील दवाखान्यात दाखल करण्यात आल्याचें सांगण्यात येते यातील तीन ते जखमीना नांदेड शासकीय रुग्णालयात पठाण्यात आले आहे 

Post a Comment

0 Comments