Header Ads Widget

सोन्याचे घबाड मिळणार या लालसे पोटी कृष्णुरच्या फुलमळ्या जवळील असलेल्या महादेव मंदिरातील अज्ञात चोरट्यानी पिंड बाजूला काढून एक फुटाचा खोदला खडा कुटूर ठाण्याचे सपोनि पुरी घटनास्थळी रवाना -

      माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या कृष्णूर एमआयडीसी मधील पुरातन असलेल्या फुल्ल मळ्यात एक पुरातन महादेव मंदिर असल्यामुळे या मंदिराच्या भोवताली व मंदिरात एक मोठे सोन्याचे घबाड असल्याचे काही लोकांना भास होता त्यानुसार सहा सप्टेंबर दोन हजार बावीसच्या जवळपास मध्यरात्रीच्या दरम्यान काही अज्ञात आरोपीने मंदिरात घुसून मध्ये असलेल्या महादेवाची पिंड बाजूला काढून एकंदरीत एका फुटाचा खड्डा खोदून सोन्याचा हंडा मिळेल या लालसेपोटी खड्डा खोदण्यात आला असल्यामुळे सदरची माहिती कुंटूर पोलिस ठाण्याला मिळताच ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांनी आपल्या पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी रवाना झाले आहेत
फुलमळ्याच्या मंदिरात घडलेल्या घटनेतील सोन्याचा हांडा मिळा की दऱ्या काठचा शंक मिळाला यांची ही जोरदार चर्चा चालू असली तरी आदिक घटनेचा तपास जलद गतीने लागावा म्हणून नांदेड येथील स्वयन पथकाला पाचारण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे
कुटुंर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्यासह बिट जेमादार कुमरे व पोलीस जीप चालक तथा जेमादार सदाशिव पाटील हे घटस्थळाची व मंदिर व परिसरात सदरच्या अज्ञात चोरट्यानी खडा खोदला यांची चौकशी केली असून सदरचे फुलमळ्यातील महादेव मंदिर हे मेडिकल कंपनीच्या अगदी जवळ लागून असल्यामुळे या मंदिराच्या समोरुन कंपनीत काम करण्यासाठी जात असतात अशा या वर्दळीच्या ठिकाणी असा प्रकार घडला आहे 
तालुक्यातील कुंटूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या कृष्णुर या गाववासियांचे पुरातन काळापासून असलेले महादेव मंदिर हे दैवत मानले जाते परंतु या मंदिरात गेल्या अनेक वर्षापासून कुणी तरी सोन्याचा हंडा दडून ठेवल्याची अफवा होत होती अफवा अनेक वर्षा पासून चालत असल्यामुळे रात्रीच्या वेळी या मंदिराच्या परिसरात व महादेव मंदिरात अज्ञात भोंदू बाबांनी व अज्ञात चोरट्यांनी सदरचा परिसर पिंजून काढून असल्याचा संशय असून अखेर महादेव मंदिराच्या मंदिरात जाऊन चक्क पिंडच वर उचलून काढून त्या पिंडीच्या खाली अंदाजे ८ ते १० इंच उंचीचा व खोलीचा खडा खोदून सोन्याचा हंडा हती लागेल या उद्देशाने पाहिले व त्या ठिकाणी काय सापडले  व अज्ञात व्यक्तीचा शोध कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी घेत आहे






Post a Comment

0 Comments