Header Ads Widget

ई डी सरकारच्या तीन महिन्याच्या कार्यकाळा नंतर नांदेड जिल्ह्यासाठी तीन जिल्ह्याचा पालकमंत्री नांदेडला अखेर मिळाला ! कलेक्टर कधी मिळणार ? जनतेचा सवाल !

      माधव पवार 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत गेले अनेक दिवस पालकमंत्र्यांची नेमणूक कधी होणार हा प्रश्न जनतेसह राजकीय वर्तुळातुन विचारला जात होता परंतु अखेर नुकतीच पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली आहे यात ई डी सरकारच्या तीन महिन्याच्या कार्यकाळा नंतर नांदेड जिल्ह्यासाठी तीन जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन नांदेडला अखेर मिळाले असले तरी या जिल्हासाठी कलेक्टर कधी मिळणार ? असा जनतेनी सवाल  केला आहे 

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर,वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहेत 

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर आणि सोलापूर, सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर आणि गोंदिया.चंद्रकांत पाटील- पुणे.विजयकुमार गावित- नंदुरबार.गिरीश महाजन- धुळे,लातूर, आणि नांदेड.गुलाबराव पाटील - बुलढाणा, जळगाव.दादा भुसे- नाशिक.संजय राठोड- यवतमाळ आणि वाशिम.सुरेश खाडे- सांगली.संदिपान भुमरे औरंगाबाद उदय सामंत- रत्नागिरी, रायगड.तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद.रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,अब्दुल सत्तार- हिंगोली.दीपक केसरकर -मुंबई शहर आणि कोल्हापूर.अतुल सावे - जालना, बीड. शंभूराज देसाई - सातारा, ठाणे.मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर.मंत्री मंडळातील कोणती खाती कोणाकडे आहेत ?

राज्यात महत्त्वाचं मानलं जाणारं गृहमंत्रिपद आणि अर्थमंत्रिपद ही दोन खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. नगर विकास खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:कडे ठेवलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें कडची खाती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क,सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक प्रकल्प परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृदा व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग असतील.व उपमुख्यमंत्री देवेंद्र

"" उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडील खाते ""

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

Post a Comment

0 Comments