Header Ads Widget

माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते टॉकी बांधकामासह नळ योजनेच्या कामाचे भव्य उदघाटन -

माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते टॉकी बांधकामासह नळ योजनेच्या कामाचे भव्य उदघाटन -
      माधव पवार
नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते उमरी व धर्माबाद तालुक्यातील बेलगुजरी येथे गावकऱ्याच्या हितासाठी महाराष्ट्र शासनाने सन १५ ऑगस्ट २०१९ रोजी घोषित केलेले योजनेच्या अंतर्गत म्हणजे जल जीवन मिशन ( जेजेएम ) सन २०२४ च्या साला पर्यंत टॉकीच्या बांधकामा बरोबर व नळ योजनेच्या कामाचे भव्य उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे
तालुक्यातील बेलगुजरी आयोजित करण्यात आलेल्या  जलजीवन मिशन अंतर्गत टॉकीच्या व नळ योजनेच्या उदघाटन प्रसंगी ८९ नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले तर माजी आमदार दिवंगत बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे सुपुत्र कैलासजी बापूसाहेब देशमुख गोरठेकर, दत्ताहरी पाटील चोळाखेकर यांच्या आदी गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते 
बेलगुजरी येथे सदरच्या योजनेसाठी ६४ लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला असल्यामुळे  सदरचा भव्य शुभारंभ मा.आ.वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते करण्यात आला आहे 

महाराष्ट्र शासनाने प्रत्येक ग्रामीण घरात नियमित आणि दीर्घकालीन आधारावर पुरेशा दाबाने विहित गुणवत्तेच्या पुरेशा प्रमाणात नळाच्या पाण्याच्या पुरवठ्याची तरतूद करण्यासाठी राज्यांच्या भागीदारीत राबविण्यात येत आलेल्या योजनेच्या अंतर्गत बेलगुजरी येथे सदरच्या टॉकी व नळ योजनेच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले आहे 

Post a Comment

0 Comments