बरबडा किरण हणमंते -
बरबडा येथील रहिवाशी असणारे माजी शिवसेना जिल्हा उपप्रमुख पदी निवड झाल्याचे पत्र शिवसेना सचिव संजय भाऊराव मोरे यांच्या सहीने दिले आहे.ही निवड महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार निवड केल्याचे सांगण्यात आले आहे.नायगाव, मुखेड, देगलूर, बिलोली विधानसभा या कार्यक्षेत्रा पुरती नियुक्ती करण्यात आली आहे
या नियुक्तीचा कालावधी एका वर्षांसाठी असून वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण घेऊन शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सदरची नियुक्ती केल्याचे या नियुक्ती पत्रामध्ये सांगल्याचे समजते. या निवडी बद्दल सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
या वेळी जिल्हाप्रमुख उमेश मुंढे , जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर , शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष सुभाष द. पेरेवार उपस्थित होते .

0 Comments