Header Ads Widget

हिमायतनगर येथे सरपंच संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांची निवड !!🌷


       नागोराव शिंदे 
विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजावणारे हिमायरनगरचे तत्कालीन दैनिक प्रजावाणीचे व सध्याचे देशोन्नतीचे जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांची नुकतीच हिमायतनगरच्या सरपंच संघटनेच्या तालुकाध्याक्ष पदी निवड करण्यात आल्यामुळे त्यांच्या निवडीचे राजकीय क्षेत्रासह सामाजिक व विविध संघटनेच्या माध्यमातून अभिनंदन करण्यात येत असून पत्रकार गोपतवाड यांनी अनेक वर्षा पासून सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग आहें
जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड जनसामान्य माणसाच व्यक्तिमत्व असून त्याच बरोबर पत्रकारिताच्या माध्यमातून जनसामान्य माणसाला न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकाराची सरपंच संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असल्यामुळे त्यांचे जिल्ह्यासह तालुक्यात अभिनंदन करण्यात येत असून नायगाव फास्ट न्यूजचे हिमायतनगर तालुका प्रतिनिधी नागोराव शिंदे यांनी त्यांच्या निवडी बदल अभिनंदन करून शुभेच्छा 🌷दिल्या आहेत 

महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानात गोपतवाड यांची बडिया कामगिरी !
महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर पाटील यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणा पासून व पर्यायाने गुन्ह्यांपासून परावृत्त करणे यासाठी अस्तित्वात आणली आहें

महाराष्ट्र शासन अधिकृत प्रकल्प असून दिनांक १५ ऑगस्ट २००७ साली या योजनेची सुरुवात सर्वत्र  करण्यात आली उत्कृष्ट काम करणाऱ्या गावाला शासनाच्या मार्फत तीन लाखचे बक्षीस देण्यात आले होते त्या चौकशी समितीवार जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांची नेमणूक करण्यात आली होती व अनेक गावांना तीन लाखाचे बक्षीस मिळवून देण्यास त्यांचा सिंहाचा वाटा होता 

Post a Comment

0 Comments