Header Ads Widget

प्रधानमंत्री जनधन योजना एस बी आय बँक अधिकाऱ्याचा भोंगळ कारभारामुळे खात्यातून दहा हजार रुपया पेक्षा जास्त रक्कम मिळेना ग्राहक हैराण -

     मधुकर जवळे 
नायगाव येथील एस बी आय बँकेच्या जनधन खात्यातुन ग्रहकाला दहा हाजार रुपया पेक्षा जास्त रक्कम मिळत नसल्यामुळे सदरचे बँकेचे खातेदार हैराण असल्याचे दिसून येत असून सदरच्या बँकेवर जनता व शेतकरी नौकरी वर्गाचे कर्मचारी हे चांगल्या दर्जेची बँक म्हणून आर्थिक व्यवहार करीत असतात शासनाने जनधन नावाचे खाते तमाम जनतेला काढण्यासाठी सांगितले त्यानुसार ग्रामीण भागातील नागरिक या एस बी आय बँकेत खाते उघडले परंतु खात्यातील पैसे काढत असताना लिमिट संपले असे दाखवित आहे
सदरील एस बी आय बँकेत ज्या ग्राहकानी खाते जनधनचे काढले त्या खात्यातुन रक्कम निघत नसल्यामुळे ग्रहकाची परेशानी वाढली असून सदरची रक्कम निघत नसल्याने खाते बंद करण्यासाठी ग्राहक तयार झाले आहेत पंतप्रधान जनधन योजना ही नावाच उरली असून सदरच्या खात्यातुन स्वतःचे पैसे असताना सुद्धा बँकेत ही मिळत नसल्यामुळे ग्राहकातुन संताप व्यक्त केला जात आहे 
एस बी आय बँकेचा आर्थिक व्यवहार मोठया प्रमाणात चालत असला तरी गोरगरीब शेतकरी व नागरिक बँकेच्या ए टी एम द्वारे पाच पाच दिवस दहा दहा दिवस पैसे इड्रॉल होत नाहीत २४ तासाचा वेळ देते आणि पैसे काढत असताना परत पैशाचे लिमिट संपले परत २४ तासा विलंब देत असल्यामुळे ग्राहक गेल्या पाच ते दहा दिवसा पासून पैसे उचलण्यासाठी परेशान होताना दिसत आहेत अशा गंभीर बाबीकडे बँकेच्या शाखा अधिकाऱ्याना लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नसल्यामुळे असे प्रकार होत आहे


Post a Comment

0 Comments