Header Ads Widget

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणच्या कृष्णूर नरसी मांजरम येथे सहाय्यक अभियंत्याच्या तीन तर लाईनमनाच्या दहा जागा रिक्त जिल्हा अधीक्षक अभियंत्यानी लक्ष दयावे

     माधव पवार 
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक यांच्या दुर्लक्षनामुळे नायगाव तालुक्यातील कृष्णूर नरसी मांजरम युनिट येथे सहायक अभियंत्याच्या तीन जागा रिक्त असल्यामुळे व लाईनमनाच्या दहा बारा जागा रिक्त असल्यामुळे विद्युत वितरण कंपनीचा विद्युत पुरवठा नेहमीसाठी खंडित होत आहे
विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी अपुरे अधिकारी व कर्मचारी पडत असल्यामुळे लाईटचा खेळखंडोबा होताना दिसत असून या बाबीकडे विद्युत वितरणच्या वरिष्ट अधिकाऱ्यानी वेळीच लक्ष देऊन सदरच्या रिक्त जागा भराव्यात अशी मागणी होत आहे
नायगाव विभागांतर्गत येणाऱ्या नरसी शाखेचे अभियंता व्ही पी खोबगडे काही महिन्या खाली निलंबीत करण्यात आले कारण त्यांच्यावर वसुलीचा ठपका लावण्यात आला परंतु नांदेडच्या अधीक्षक अभियंत्याच्या ढिसाळ नियोजनामुळे नायगाव विभागात सहाय्यक अभियंत्या सारख्या अधिकाऱ्याचे पद रिक्त आहेत

तर कर्मचाऱ्याचे ही आहेत वसुली कशी होणार हा महत्वाचा प्रश्न असून अधिकारी व कर्मचारी वसुली करत बसले तर विद्युत वितरणच्या लाईटचा खोंळबा होऊ लागला तर कामे करत बसले तर वसुली थांबत असताना दिसून येत आहे 


तालुक्यातील नरसी, कृष्णूर, मांजरम या ठिकाणी महत्वाच्या साहायक अभियंत्याच्या जागा रिक्त असल्यामुळे व कर्मचाऱ्यांच्या ही रिक्त पदे असल्यामुळे व अपुरे कर्मचारी पडत असल्यामुळे विद्युत वितरण कंपनीचे कामे खोंळबुन जात असल्यामुळे शेतकऱ्यांसह घरगुती मिटर धारक चांगलेच वैताकले असल्याचे दिसून येत आहे

विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याना व कर्मचाऱ्यांना वसुलीत चांगला फटका बसत असून कारण अपुरे कर्मचारी असल्यामुळे वसुली वाटेल तेवढी होत नाही आणि दुसरी बाजू शेतकऱ्यांना व घरगुती मिटर धारकाला सुरळीत मिळत नसल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यानी लक्ष घालून सदरच्या रिक्त जागा भराव्यात अशी मागणी होत आहे

Post a Comment

0 Comments