हिमायतनगर : नागोराव शिंदे -
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिरपल्ली केंद्र - सिरंजनी ता. हिमायतनगर जि.नांदेड येथील उपक्रमशील जिल्हा पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक श्री. डी. एच. जालने यांची कन्या कु. श्रेयश्री दत्ता जालने हिच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड, उजळणी, पेन, अशा आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करत अनोखा आदर्शवत वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संतोष जाधव, उपाध्यक्ष राजु तपासकर, गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. शिवाजी पाटील जाधव, श्री, मदनराव पाटील जाधव, माजी अध्यक्ष प्रभाकर जाधव, संदिप जाधव, धोंडबा निसाळकर, रविकांत जाधव, ज्ञानेश्वर बेंद्रे, नंदकिशोर पवार, सुभाष जळपते, लक्ष्मण गुमलवाड, अंगणवाडी ताई सौ. चंद्रकलाताई गर्दसवार मॅडम, जिजाबाई बेंद्रे, अरूणाताई जाधव, शाळेचे मुख्याध्यापक श्री, गोणे सर व गावातील युवा वर्ग व महिला उपस्थित राहुन वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.

0 Comments