Header Ads Widget

जनसेवा हीच ईश्वर सेवा लोकनेते निलेश भाऊसाहेब देशमुख यांच्या अविरत संघर्षाचा प्रवास !! सुजळ नेतृत्वाचा सुजळ लेख !!

       माधव पवार 
माणसाने जन्म घ्यावा पण जगणे असे असावे की आपल्या कर्माने इतरांच्या आयुष्यात प्रकाश पडावा  हेच ब्रीद वाक्य उराशी बाळगून कोणती ही जात-पात न मानता आणि कोणत्या ही आर्थिक स्वार्थाची अपेक्षा न ठेवता अविरत पणे लोकसेवेचा यज्ञ चालू ठेवणारे नेतृत्व म्हणजेच नायगाव तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी रुई बु नगरीच भूषण निलेश भाऊसाहेब देशमुख होय 

​आयुष्यात अनेक चढ-उतार आले वादळे आली पण जनसेवेचा घेतलेला वसा त्यांनी कधी ही सोडला नाही एक वेळ थेट 'उप सरपंच' म्हणून तर एकवेळ 'सरपंच प्रतिनिधी' म्हणून अशी सलग १० वर्षे त्यांनी आपल्या गावासाठी सतत मेहनत घेत आहे.

​सर्वसमावेशक नेतृत्व लहानात लहान ते मोठ्यात मोठ्याशी नाते!​निलेश भाऊंसाहेब देशमुख यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची नम्रता आणि आपुलकी. गावातील लहानात लहान बालका पासून ते अगदी वयस्कर आजोबां पर्यंत आणि मोठ्यात मोठ्या व्यक्ती पर्यंत प्रत्येकाशी त्यांचा थेट आणि जिव्हाळ्याचा संबंध आहे

भाऊंसाठी गावातील प्रत्येक नागरिक हा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहे. सुख असो वा दुःख, हक्काने हाक मारावी अशी व्यक्ती म्हणजे निलेशभाऊ!
​विकासाचा ध्यास आणि वंचितांना न्याय
​केवळ पदावर राहून राजकारण करणे भाऊंना कधी जमलेच नाही, त्यांनी समाजकारणाला प्राधान्य दिले. त्यांच्या १० वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी गावाचा कायापालट करण्यासाठी रक्ताचे पाणी केले आहे 
​ 
निराधारांचा आधार गावातील अगतिक वृद्ध आणि निराधार महिलांच्या मागे भाऊ नेहमी ढाल बनून उभे राहिले. त्यांच्या हक्काच्या योजना, पेन्शन आणि न्याय मिळवून देण्यासाठी भाऊंनी नेहमीच प्रशासनाशी लढा दिला आहे 
​
घरकुलाचे स्वप्न साकार प्रत्येक गरिबाच्या डोक्यावर हक्काचे छप्पर असावे या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी गावातील गरजूंपर्यंत 'घरकुल योजना' प्रत्यक्ष पोहोचवली आणि अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण केले आहे 
​
वैयक्तिक लाभाच्या योजना शासकीय योजना केवळ कागदावर राहू न देता, त्या थेट गावकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवल्या. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, तरुणांचे प्रश्न असोत की महिलांचे सक्षमीकरण, प्रत्येक वैयक्तिक लाभाच्या योजनेचा फायदा गावकऱ्यांना करून देण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली.
​निस्वार्थी कर्मयोगी आहे 

​आजच्या राजकारणात जिथे स्वार्थ आणि पैसा महत्त्वाचा मानला जातो, तिथे निलेशभाऊंनी 'zero आर्थिक स्वार्थ' ठेवून काम केले. राजकारण हे कमवण्याचे साधन नसून, समाज बदलण्याचे माध्यम आहे हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे 

​आयुष्यातील अनेक चढ-उतारांवर मात करत, आज ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नायगाव तालुक्यात पक्ष संघटना मजबूत करत आहेत आणि जनतेचे प्रश्न मांडत आहेत.
​"
पद येते आणि जाते, पण जनतेच्या हृदयात निर्माण केलेले स्थान कधीच पुसले जात नाही."
​निलेशभाऊ देशमुख यांनी आपल्या १० वर्षांच्या अखंड तपस्येतून गावकऱ्यांच्या मनात हेच अढळ स्थान निर्माण केले आहे

त्यांच्या या निस्वार्थी लोकसेवेला आणि भावी राजकीय व सामाजिक प्रवासाला त्यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! - सूर्यकांत शंकरराव पांडे - 

Post a Comment

0 Comments