Header Ads Widget

शेतकऱ्यांना पिक विमा मिळून देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे शासन दरबारी युद्ध पातळीवर प्रयत्न चालूच !!

       माधव पवार 
नांदेड जिल्हाचे कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी शासन दरबारी युद्ध पातळीवर मोठे प्रयत्न करीत असल्यामुळे शेतकऱ्याच्या बँक खात्यात काही दिवसातच पीक विमा जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे 
जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना पिका विमा काही प्रमाणात मिळाला होता परंतु बाकी शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसल्यामुळे शेतकरी राजा मोठा हैराण झाला होता परंतु आता काही दिवसातच पीक विमा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे कलेक्टर राहुल कर्डीले यांनी शासन दरबारी मोठे प्रयत्न केले आहे 
जिल्हाचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ श्रीकर परदेशी यांनी सुद्धा शेतकऱ्याच्या असो की जन सामान्य माणसाच्या समस्या असो त्यांनी संपर्क करताच संबंधित अधिकाऱ्याना फोन करून प्रश्न मार्गी लावत होते 
नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत सुद्धा जन सामान्य माणसाचे फोन उचलून त्यांच्या प्रश्न नीट समजावून घेऊन त्याना योग्य उत्तर देत होते 

तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर हे मात्र नांदेड जिल्ह्यात कार्यरत असताना कोणत्या ही शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावत नव्हते आणि कोणत्या ही शेतकऱ्याचे व जन सामान्य माणसाचे फोन उचलत नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांना व जन सामान्य माणसाला अनेक समस्याना सामोरे जावे लागले होते 

शेतकऱ्यांना पिक विमा मिळून देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे शासन दरबारी युद्ध पातळीवर प्रयत्न चालूच असल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा लवकरच मिळणार आहे 

Post a Comment

0 Comments