Header Ads Widget

कृष्णूर पंचायत समिती गणातुन निवडणूक लढविण्यासाठी नागार्जुन मांडणीकर ही इच्छुक !!

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मांडणी येथील रहिवासी असलेले देविदास राक्षसमारे यांचे चिरंजीव नागार्जुन देविदास मांडणीकर हे सध्याच्या परिस्थिती मध्ये निवडणुका लागल्या असल्याने सदरील कृष्णूर पंचायत समिती गणनातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे 

तालुक्यातील कृष्णुर पंचायत समिती निवडणुकीची चाहूल लागल्यामुळे ही सदरची निवडणूक लढविण्यासाठी अनेक भावी उमेदवार व सदस्य इच्छुक असले तरी सध्या चर्चेत असलेले देविदास राक्षस सुमारे यांचे चिरंजीव नागार्जुन देवदास मांडणीकर यांनी सदरच्या निवडणुकीच्या रिंगणात निवडणूक लढविण्यासाठी तयारी दर्शवली आहे 

मांडणी येथील भूमिपुत्र नागार्जुन देविदास राक्षसमारे यांनी सदरची निवडणूक लढविणार असल्याची माहीती दिली असून या परिसरांचा विकास करण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेणार असल्याचे ही सांगितले आहे 

सदरची निवडणूक अगदी तोंडावर आल्यामुळे अनेक इच्छुक भावी उमेदवार पंचायत समितीचे सदस्य होण्यासाठी या कृष्णुर पंचायत समिती गणनातून निवडणूक लढविण्यासाठी हालचाली चालू केल्या आहेत




Post a Comment

0 Comments