Header Ads Widget

नांदेड जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अवैध धंदे बंद करण्याच्या संदर्भात दिल्या सूचना !!


विशेष प्रतिनिधी : नागोराव शिंदे 

हिमायतनगर.येथील पोलिस ठाण्यात जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी भेट दिली असून भेटीनंतर हिमायतनगर नायगाव फास्ट न्यूज  प्रतिनिधीस माहिती देताना जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार यांनी सांगितले आहे 

नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्या पासून जिल्ह्यातील अवैध धंद्यावर आळा बसविण्यासाठी मोठे प्रयत्न करीत असून जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या म्हणजे ३६ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत चालत असलेले अधून मधून अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात याव्यात म्हणून संबंधित पोलीस ठाण्याला सूचना देत आहेत 

जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्याला भेट देऊन संबंधित ठाणे प्रमुखांना या हिमायतनगर तालुक्यातील सर्वच अवैध धंदे बंद करा अशा सूचना देऊन अवैध धंद्यावर आळा बसण्यासाठी नांदेड जिल्ह्यात मोठे प्रयत्न करीत आहेत 

हिमायतनगर तालुक्यात वाळू माफिया  गुटखा माफिया  देशी विदेशी दारू जुगार अडे ऑनलाइन मटका अवैध वाहतुक धंदे जोमात असल्यामुळे हिमायतनगर शहरासह तालुक्यातील अवैध धंद्या विरुद्ध कडक कारवाई करण्याच्या  कडक सूचना हिमायतनगर पोलीस निरीक्षक अमोल भगत यांना दिल्या आहेत 

ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल भगत पोलीस निरीक्षक यांनी लक्ष ठेऊन असल्यामुळे अवैध धंदे वाल्यांवर कायद्याचा धाक दाखविण्यासाठी सज्ज असल्याचे सांगण्यात येते आहे 

तालुक्यातील व शहरातील अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अमोल भगत यांना दिल्या असल्याचे सांगितले आहे 

यावेळी त्यांनी पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा आडवा घेतला तसेच पोलीस ठाण्यात करण्यात आलेले विविध कामाची पाहणी करून पोलीस अधीक्षक यांनी समाधान व्यक्त केले आहे

Post a Comment

0 Comments