Header Ads Widget

नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या धास्तीने राज्य महामार्गावरील पान टपऱ्या गुटखा मुक्त ?

       माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश पाळून जिल्ह्यात अवैध पणे गुटखा मटका देशी दारू विदेशी असे विविध पद्धतीचे मद्यपान विक्री करत असलेल्या ठिकाणी विविध पथकांच्या माध्यमातून धाडी टाकत असल्यामुळे अवैध रित्या धंदा करणाऱ्याला चांगलीच धास्ती बसली असल्याचे स्पष्ट चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे 

नांदेड परिक्षेत्राचे उपमहा निरीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यात अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी आपले शासकीय शस्त्र हाती घेतल्यामुळे नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या पान टपऱ्यावर गुटखा मुक्त ? झाला की अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे 

तत्कालीन नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तथा सध्याचे नांदेड परिक्षेत्राचे उपमहा निरीक्षक शहाजी उमाप यांनी अशाच पद्धतीने अवैध धंदे करणाऱ्यांवर
अनेक कार्यवाह्या केल्या होत्या व अवैध धंदे करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणावली होती 

तशाच पद्धतीने सध्याच्या परिस्थिती मध्ये नांदेड परिक्षेत्राचे शहाजी उमाप यांनी जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री  करणाऱ्यावर पोलीस कारवाही करण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांना आदेश दिल्यानुसार पोलीस अधीक्षक कुमार यांनी जिल्ह्यात धडक मोहीम राबवली आहे 

नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या धास्तीने राज्य महामार्गावरील पान टपऱ्या गुटखा मुक्त ? झाला की अशी सध्याच्या परिस्थिती मध्ये वातावरण दिसून येत असले तरी गुटखा खाणाऱ्याची मात्र चांगलीच चंगळ उडाली आहे 

Post a Comment

0 Comments