नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघातील पक्षांचे एकनिष्ठ काम करणारे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माजी आमदार वसंतराव चव्हाण त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या मतदार संघाचे माजी आमदार दिवंगत बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या माध्यमातून नायगाव विधानसभा मतदार संघाला चांगल्या पद्धतीचे नेतृत्व मिळाले आहे
नायगाव मतदार संघाचे नेतृत्व करणारे माजी आमदार वसंतराव चव्हाण त्याच बरोबर माजी आमदार दिवंगत बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्यातील राजकारणातील एकनिष्ठ पणा आणि या दोन नेत्यांची लढाई म्हणजे वैचारिक पद्धतीची व नायगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी राहत होती विरोध असायचा परंतु विकास करण्यासाठी असायचा हे आजही आठवण करून देते असे म्हणे अवघे ठरणार नाही हे स्पष्ट आहे
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला राम राम करून भाजप पक्षात प्रवेश केले असल्याने कमालीच्या वातावरणाची चर्चा निर्माण झाली असली तरी नायगाव विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करण्यासाठी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांची अत्यंत गरज असून सदर पक्षाला मजबूत करण्यासाठी काळाची मोठी गरज आहे
देशमुख गोरठेकर आज राहिले असते तर राष्ट्रवादी काँग्रेसला व काँग्रेस पक्षाला नायगाव विधानसभा मतदार संघात मोठी पोकळी अथवा खिंडार निर्माण झाली नसती हा महत्वाचा विषय आता जनतेला भेडसावत आहे

0 Comments