हिमायतनगर. नागोराव शिंदे
मराठा आरक्षणासाठी सात महिन्यांपासून अहो रात्र झटणारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे आपला लढा सुरू केला असून २६ जानेवारीला आमरण उपोषणाला आझाद मैदानावर बसण्यासाठी २०जानेवारीलाअंतरवाली सराटी येथुन लाखो मराठा बांधव सह पायी निघाले आहेत
या पायी मोर्चात सहभागी होण्यासाठी पळसपुर ता हिमायतनगर येथील १४कार्यकर्तेआज२२रोजी रात्री निघाले असल्याने त्या मध्ये तानाजी देवसरकर,किशन देवसरकर, अवधूत देवसरकर,राजु कदम, हनुमान वानखेडे, दिनेश वानखेडे, तुषार वानखेडे, तानाजी वानखेडे, नागेश वानखेडे,
अनिल देवसरकर, विठ्ठल कदम, विठ्ठल पतंगे, कोंडीबा कदम, असे गावातील १४मराठा समाज बांधव मुंबई कडे निघताच गावातील नागरिकानी त्यांची गावभर मिरवणूक काढुन त्यांचे टाळ मृदंगाच्या गजरात स्वागत करुन मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथुन मुंबईला निघालेल्या मोर्चात सामील होण्यासाठी रवाना झाले केले आहे

0 Comments