महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण यांच्या मार्फत लावण्यात आलेल्या वृक्ष लागवडी दरम्यान मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचाऱ्याकडून प्रशासनाची दिशाभूल करण्यात आली असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येतं आहे
दरवर्षीय या विभागा मार्फत वृक्षांची लागवड केली जाते परंतु सदरचे लावलेले वृक्ष जनावरे शेळ्या मेंढ्या खाऊन जातात कारण या विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे कुंपण सुद्धा केले जात नसल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे
महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण या विभागाचे अधिकारी व कर्मचारी लाखो वृक्षांची लागवड करतात परंतु कुठे ही झाडे जिवंत असल्याचे चित्र दिसत नाहीत नायगाव तालुक्यात सामाजिक वनीकरण मार्फत करण्यात आले आहे
सदरील कामे सामाजिक विभाग वनीकरणचा कर्मचारी अंबुलगे खड्डे करताना व वृक्ष लागवड करताना लेबर सोबत राहतो यांच्या कडून कसल्याच प्रकारची दखल घेतली जात नसल्यामुळे वृक्ष सर्व वाळून गेली आहेत
ग्रामीण भागात सामाजिक वनीकरण विभागामार्फत करण्यात येत असलेली वृक्षांची लागवड केवळ पुराणी जागेवर म्हणजेच त्याच ठिकाणी वृक्षांची लागवड केली जाते त्याच खड्ड्यात खड्डा खोदला जातो वर्षांची लागवड सुद्धा नीटनेटकी केली जात नाही झाडे फेकून दिले जातात असे अनेक वेळा घडले आहे
एकदा झाड लावल्याच्या नंतर त्याला कुंपण लावले जात नाही अशा पद्धतीचे कामे करून शासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करावी अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा बालाजी पवार यांनी दिला आहे

0 Comments