तालुक्यातील मोजे पळसपुर येथील ३३ के वी सब स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पळसपुर गावांमध्ये हिमायतनगर वरून विद्युत पुरवठा सप्लाय करण्यासाठी १९ ७६ ७७ सालि या गावांमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत बोर्डाची लाईट चा प्रकाश पडला आहे
तेव्हा पासून आता पर्यंत या गावांमधील विद्युत ग्राहकांना घरगुती मीटरला सप्लाय करणारा विद्युत तारा बदलल्या नसल्यामुळे जागोजागी पोलवरून चालू असलेल्या विद्युत पुरवठ्यामध्ये तारा तुटत असून त्यामुळे गावातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता पवन भडंगे यांना प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत संघटन समितीचे मीडिया जिल्हा प्रभारी अध्यक्ष नागोराव शिंदे यांनी एका निवेदनाद्वारे तात्काळ तारा बदलून देण्याची मागणी केली आहे
यावेळी ए ए ठाकूर मॅडम आस्थापना ,पाडेवाढ उच्च स्तर लिपिक ,एस के धडेकर कनिष्ठ लिपिक उपस्थित होते
निवेदनामध्ये नागोराव शिंदे यांनी पळसपुर येथील गावात गेले ४७ वर्ष पूर्वी ला गावात विद्युत पुरवठा सुरू झाला तेव्हा पासून विद्युत वाहिनीचे तारा व लोखंडी पोल आज पर्यंत बदलण्यात आले नसल्याने ते जिर्ण झाले आहे
यामुळे गावातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने अधीक्षक अभियंता नांदेड मुख्य कार्यालय यांच्याकडे उपकार्यकारी अभियंता हिमायतनगर यांच्यामार्फत आज एक निवेदन देऊन गावातील विद्युत तारा तात्काळ बदलून देण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी गावातील संजय वाडेकर हे उपस्थित होते

0 Comments