Header Ads Widget

मनुरच्या शेतकऱ्याची नायगावच्या तहसीलदारानी - घेतली दखल - गारपीटीची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी करणार प्रयत्न -

         माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मनूर येथील ७०० शेतकऱ्यां पैकी १०४ शेतकऱ्यांनाच गारपीटीची पैसे आली असल्यामुळे या गावचे तलाठी संदीप पवार यांनी गावातील काही निवडक माणसाच्या म्हणण्यावरून ५९६ लोकांना ढावलून टाकून दिले असा आरोप मनुरच्या शेतकऱ्यांनी केला आहे
नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी सदरील बाबीची चौकशी करून सदरच्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असले त्यांनी सांगितले आहे

तालुक्यातील मनूर येथील २०२२ ते २०२३ मध्ये या विभागात गारपीट झाली होती तत्कालीन तलाठ्यांच्या हातावर सदरचे पंचनामे करण्यात आले होते
त्यानंतर तलाठी संदीप पवार यांनी काही काळानंतर मनुरचा पदभार स्वीकारला होता तलाठी यांच्याशी संपर्क करून माहिती घेतली असता यादीमध्ये जेवढे नावे होते तेवढे शासनाकडे सादर केले असल्याचे त्यानी सांगितले आहे

मनूर येथील शेतकरी  उर्वरित ७०० पैकी ६९६ शेतकऱ्यांना तात्काळ गारपीटचे पैसे मिळावेत म्हणून नायगावच्या तहसीलदारांना निवेदन देऊन मागणी केली आहे

सदरच्या निवेदनाची दखल घेऊन नायगावच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार मंजुषा भगत यांनी सदरील प्रकरणाची लवकर चौकशी करून पात्र लाभार्थ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments