नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असल्यामुळे टोल नाक्या जवळ एक शेगाव येथील वयवृद्ध असलेला आजोबा हा कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत रस्त्यावर रात्र भर पावासाने भिजून हुडहूड व भुकेने व्याकूळ झालेल्या आजोबावर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे यांनी पेट्रोलिंग करत असताना अचानक नजर गेली त्या वयवृद्ध व्यक्तीना कपडे घालून नांदेडच्या दवाखान्यात पाठवून दिले आहे
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बहातरे यांनी सदरची पोलीस गाडी थांबवुन चौकशी केली असता रात्रभरच्या पावसाने घायाळ झाला होता सदरचा आजोबाला १०८ बोलावून घेऊन नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिले अशी कामगिरी सपोनि बहातरे यांच्यासह जमादार भार्गव सुवर्णकार जमादार कंधारे यांनी केली आहे -
गरीबाच्या मदतीसाठी धावून आलेले कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि बहातरे त्याच बरोबर जमादार भार्गव सुवर्णकार यांनी देवदूत म्हणून शेवगावच्या आजोबांसाठी नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर अचानक प्रकट झाली आणि पोलिसांच्या मदतीला काहाळ्याचे पोलीस पाटील ही धावून आले असल्यामुळे कुंटूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदरचा शेगावचा वयवृद्ध रस्त्यावर पडला होता सपोनि विशाल बहातरे यांनी आज दिनांक ४ सप्टेंबर २०२३ रोजी नांदेड जिल्हा बंदच हाक सकल मराठा समाजाने दिली असल्यामुळे पोलीस पेट्रोलिंग चालू होती यावेळी हा आजोबा दिसून आला त्यांचे वय अंदाजे ७० ते ७५ वर्ष असून त्यांना एका हॉटल मध्ये नेवून खिचडी खाऊ घालण्यात आली आहे

0 Comments