जालना लाठीचार्ज प्रकरणी नांदेड जिल्ह्याच्या नायगाव बाजार येथे सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या नायगाव बंदला प्रतिसाद देण्यासाठी हजारोच्या संख्येने शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक नायगाव येथे राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी सकल मराठा एकत्र येणार आहे
नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी शहरात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे
जिल्ह्याच्या नायगाव येथे उद्या म्हणजे दिनांक ४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक ८ सकल मराठा समाजाने सरकारचा निषेध करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन केले त्या अनुषंगाने नायगाव पोलीस ठाण्याचे सिघंम पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी बाहेरून दोन पोलीस अधिकारी पीएसआय तसेच दहा कर्मचारी व बिलोली येथे स्ट्राइकिंग फोर्स नायगाव येथील बंदोबस्ता साठी मागविला आहे
नायगाव पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन. पो.नि. चिंचोलकर
नायगाव येथे सर्वांनी शांतता बाळगून सार्वजनिक बंदचे आंदोलन पार पाडावे व पोलीस प्रशासनाला प्रिय बांधवांनी सहकार्याची भावना ठेवून सहकार्य करावे असे पो.नि चिंचोलकर यांच्यासह फौजदार बाचावार व पोलीस प्रशासनाच्या वतीने महत्वाचे आवाहन करण्यात येत आहे
नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्यासह ठाण्याचे सर्व कर्मचारी एस आर पी एफच्या दोन तुकड्या नांदेड येथे रिझर्व आहेत तसेच आरसीबी प्लाटूनच्या सहा तुकड्या रिझर्व आहेत प्रशासना कडून सर्व फौज फाटासह १५ होम गार्ड अशी तयारी झालेली आहे
पोलीस ठाण्याच्या वतीने दिनांक ३ सप्टेंबर २०२३ रोजी १५ लोकांना मुंबई पोलीस कायदा कलम ५१ प्रमाणे नोटीसा व सीआरपीसी १५१ प्रमाणे नोटीसा देण्यात आल्या असल्याची माहिती पो.नि. चिंचोलकर यांनी दिली आहे

0 Comments