Header Ads Widget

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीची होतोय चाहूल मतदार याद्या तयार करण्यासाठी शिक्षकाला लावले कामाला - मतदारानी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपले नाव यादीत समाविष्ट करावे : जिल्हाधिकारी राऊत -

              माधव पवार
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केल्या नुसार छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कामास जिल्हा निवडणूक विभागाने गती दिली आहे

ग्रामीण भागातील शाळे वरील शिक्षक याद्या तयार करण्याच्या कामात व्यस्त असल्यामुळे विध्यार्थाच्या शिक्षणावर परिणाम होत असल्यामूळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह जी.प. मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी लक्ष देण्याची गरज आहे 
नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे शिक्षण सम्राट आहेत सध्याच्या परिस्थितीत शिक्षक नव मतदार याद्या तयार करण्यासाठी लोकाच्या घरोघरी जाऊन यादीत नाव समाविष्ट करणे मृत्यू पावलेल्या लोकांचे नाव वगळने चुकीची दुरुस्ती करणे लग्न झालेल्या मुलीचे नाव यादीत समाविष्ट करणे असे कामे कामे शासनाने लावल्यामूळे विध्यार्थी शिक्षणा पासून दूर राहत आहेत
शिक्षका कडून लग्न होऊन गेलेल्या मुलीचे नाव कमी करने त्याच बरोबर १८ वर्षाच्या तरुण तरुणीचे यादीत नाव टाकणे या कामात शिक्षक कामात मग्न असल्यामूळे विध्यार्थाच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहेजिल्हाधिकारी व तथा निवडणूक अधिकारी अभिजित राऊत यांच्यासह नांदेड जिल्हा परिषदच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करनवाल त्याच यांच्या नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई भगत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी व केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी यांनी विध्यार्थाच्या शिक्षणाकडे हीं लक्ष देण्याची मागणी पालकांनी केली आहे 

पुनरिक्षण पूर्व उपक्रम व पुनरिक्षण उपक्रम या दोन विभागात कार्यक्रमाच्या तारखा जाहीर केल्या असून लोकशाहीच्या या पवित्र मतदारन परिक्रियेत अधिक अधिक मतदारानी आपले कर्तव्य बजावण्यासाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजित राऊत यांनी केले 


Post a Comment

0 Comments