हिमायतनगर तालुक्यासह ग्रामीण भागात गेल्या दहा ते १५ दिवसा पासून या भागात पावसाने जलमय पाणी करून जणू काही शेतीवर कब्बजाच केला होता त्यां नंतर निसर्ग राजाने काही दिवसासाठी पावसाने विश्रांती दिली असल्यामुळे या भागातील शेतकरी राजा शेतातील पिकाची कोळपनी करत असल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे
तालुक्यातील शेकडो शेतकऱ्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले होते त्या पैकी पावसातुन बचलेल्या पिकाचे संगोपन करण्यासाठी शेतकरी राजा आपल्या शेतातील कोळपनीच्या कामाला जोर धरला असल्यामुळे शेतकऱ्याचा कोळपणीच्या कामाला वेग आला असल्याचार चित्र दिसून येत आहे
पावसासह बऱ्याच ठिकाणी ढगफुटीचे प्रकार घडले होते त्यामध्ये ९०% शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने कसेबसे उर्वरित राहिलेल्या पिकांसाठी गेल्या पाच दिवसापासून निसर्गाने उघाड दिल्यामुळे तालुक्यात कापूस सोयाबीन आदी पिकांच्या कोळपण्याच्या कामाला
सुरुवात करण्यात आली आहे
ढगफुटीच्या पावसामुळे गेलेल्या पिकांच्या पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करा असे शेतकऱ्यांतून नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून मागणी होत आहे

0 Comments