Header Ads Widget

राष्ट्रवादी काँग्रेस मुखेडच्या वतीने पूरग्रस्तांना अन्नधान्य किट वाटप

नांदेड /प्रतिनिधी : प्रल्हाद आयनेले सर -

मुखेड तालुक्यातील पाळा या गावी अतिवृष्टीमुळे शेतजमिनीची पिके वाहून गेली आणि गोरगरीब लोकांच्या वस्तीमध्ये पाणी शिरून अनेक घरांची पडझड होवून अनेकांचे संसार उघडय़ावर आल्यामुळे त्यांच्या मदतीला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या वतीने अन्न दाणे वाटप करण्यात आले आहे 
मुखेड तालुका राष्ट्रवादी चे अध्यक्ष शिवाजी जाधव उमरदरीकर यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह शेकडो अन्नधान्य आणि संसारोपयोगी कीट चे वाटप करून मदतीचा हात दिला.

जिल्ह्यासह मुखेड तालुक्यात सर्वाधिक पावसाने हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील अनेक गावांतील वस्तीमध्ये घरात पाणी जाऊन घरातील संसार उपयोगी साहित्य व अन्नधान्यांची नासाडी झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुखेड तालुका अध्यक्ष शिवाजी जाधव उमरदरीकर  यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांची भेट घेऊन तात्काळ सरसकट कोणताही पंचनामा न करता आर्थिक मदत  करावी अशी मागणी केली आहे 

पूरग्रस्तांना किट वाटप प्रसंगी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी शादुल भाई होनवडजकर, कैलास मादसवाड, दिनेश पाटील केरूरकर,बाबा मणियार, डुमने पाटील,शेख बाबू व अनेक सहकारी सहभागी होते.

Post a Comment

0 Comments