Header Ads Widget

रांजणगाव परिसरात अवैध धंदे जोरात*सर्वसामान्य नागरिकांना त्रास आप शिरूर व सजग नागरिकांकडून कारवाईची मागणी


रांजणगाव गणपती - प्रतिनिधी अनिल डांगे

रांजणगाव गणपती पोलीस ठाण्याच्या हद्दीत  अनेक भागात अवैध धंदे जोरात असून पोलिसांच्या डोळ्यावर पट्टी बांधल्याचे चित्र आहे.सर्वसामान्य नागरिक ,शाळकरी मुली व महिला याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

काही धंदे अक्षरश:मानवी वस्तीत असून यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे पोलिस यंत्रणेने कारवाई करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टी शिरूर व सजग नागरिक मंच,यांनी केली असून तात्पुरती पोलीस यंत्रणा पेपर दाखवण्यापुरती कारवाई करत आहे

या अवैध धंद्यातील मोठे मासे कारवाईतून बिनबोभाट सुटत असून यामुळे संबंधित यंत्रणाचे काही कर्मचारी सर्वांचे लाभार्थी असल्याचे आरोप सर्व सामान्य नागरिक करत आहे.

अवैध धंद्यामध्ये ऑनलाइन लॉटरी,मटका जुगार,सोरठ चिमणी-पाखरू ,गांजा,गुटका,हातभट्टी,विदेशी दारू विक्री सर्वाधिक आहे पुणे-नगर महामार्गावर अनेक हॉटेल वर विना परवाना दारू विक्री ,अनेक लॉज वर तर देह विक्री सुरु असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पोलिस ठाण्याच्या मार्गावर तळीराम आपली बैठक मांडतात,दिवसा बरोबर रात्री ही टोळक्याने बसून मध्यपान करणे,गांजा ओढणे केले जात आहे

मात्र पोलीस यांच्यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.*ऑनलाइन लॉटरी चालवणारे काही महाठग पोलिसांनाही जुमानत नसल्याचे चित्र आहे*.गुटका विक्री करणारे पोलीस प्रशासनाने परवाने दिले असल्यासारखे बिन-दिक्कत व्यवसाय करत आहे

यामुळे अल्पवयीन मुले कमी कालावधीत जास्तीचा पैसा कमवण्याच्या आमिषाला बळी पडून अवैध धंद्यात सामील होत आहे. परिणामी एमआयडीसीतील कामगार वर्ग तरुण व्यसनाधीन बनल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत

या सर्व परिस्थितीचे प्रशासनाला कोणत्याही गोष्टीचे सोयर-सुतक आहे का नाही असा उद्विग्न सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहे.रांजणगाव गणपती हे अष्टविनायका पैकी एक देवस्थान आहे,याच परिसरात अवैध धंदे मोठ्याप्रमाणात सुरू असणे ही नामुष्कीची बाब आहे पोलीस प्रशासन  ॲक्शन मोडमध्ये येईल का मोठा प्रश्न आहे.

अनधिकृत दारू विक्रेत्यांवर कारवाई केली आहे अवैद्य धंद्यावर कारवाई करत असून कोणाची ही हय-गय केली जाणार नाही महेश ढवाण,पोलीस निरीक्षक,रांजणगाव पोलीस स्टेशन यांनी सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments