हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर व परिसरात जोरदार पाऊस पडला असल्यामुळे खोंळबलेल्या पेरण्या शेतकऱ्यांच्या पेरणीला सुरुवात करण्यात आल्या असल्याची माहिती आमचे नायगाव फास्ट न्यूजचे हिमायतनगर तालुका प्रतिनिधी यांनी दिली आहे
तालुक्यातील पळसपूर व परिसरात दिनांक २७ जुन २०२३ रोजी संध्याकाळी ठीक सात वाजता पावसाला सुरुवात झाली होती या परिसरात आकाशात काळेकुट आभाळ असल्यामुळे रात्रभर पाऊस पडला शेतकऱ्याना पेरणी कधी लागलं असी चिंता वाटत होती निसर्गाची किमया सांगता येत नसल्यामुळे अखेर पेरण्या हिमायतनगर तालुक्यात लागल्या आहेत
पळसपूर परिसरातील शेतकरी यंदा सोयाबीन कापून तूर मूग उडीत ज्वारी आदी पिके घेण्याची शक्यता असून शेतकरी फक्त पावसाची अपेक्षा केली होती पावसाने
शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातच शेतीची पूर्ण मशागत करुन पेरणीची व पावसाची वाट पाहत होता या दोन दिवसात शेतकरी कापूस लावण्याच्या तयारीला लागले आहेत
मृग नक्षत्राचा पावसाचा प्रतीक्षेनंतर गेल्या दोन दिवसांमध्ये होत असलेल्या रिमझिम पावसामध्ये बळीराजांनी आपल्या काळ्या आई मध्ये खरिपाच्या पेरणीला सुरुवात केल्याचे चित्र मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत

0 Comments