Header Ads Widget

राज्य सरकार व केंद्र सरकारचा पाळमेळ लागत नसल्याने ग्राम रोजगार सेवक शासकीय सेवेपासून वंचित ? बिन पगारी फुल अधिकारी -

      माधव पवार
राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या ताळमेळ लागत नसल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवक यांना शासन मोठ मोठाले कामे करण्यासाठी ताकीद करते परंतु सन २००८ काम करणाऱ्या रोजगार सेवकाका दरमहा पगार देत ही नाही आणि शासकीय सेवेत कायमस्वरूपी घेत नसल्यामुळे रोजगार सेवकावर मोठी उपासमारीची वेळ आली असल्याचे रोजगार सेवकांतून बोलल्या जात आहे 

राज्यातील ग्राम रोजगार सेवक हे शासनाचे एक रुपयाचे मानधन नसताना सुद्धा भविष्यात काहीतरी फायदा होईल या अशा पोटी काम करीत आहेत परंतु राज्य शासन व केंद्र सरकार यांचा विचार शासन दरबारी करत नसल्यामुळे रोजगार सेवक हे बिन पगारी फुल अधिकारी म्हणण्याची वेळ आहे

स्वतः रोजगार सेवकावर आली असून शासन त्यांच्या कडून रोजगार हमीचे काम सुरू करण्या पासून लेबर बजेट तयार करण्या पर्यत कामे करावे लागते आहे

ग्राम रोजगार सेवकाच्या बाबतीत राज्य सरकार म्हणतो आमच्या अधिकारात नाही ते केंद्र सरकारला विचारा केंद्र सरकार म्हणतो ते आमच्या अधिकारात नाही ते राज्य सरकाराला विचारा अशा या ताळमळीमध्ये रोजगार सेवक शासकीय शिवेपासून व मानधनापासून वंचित राहत असल्यामुळे शासन दरबारी यांची कुठे तरी नोंद व्हायला पाहिजे असे ही रोजगार सेवकातून बोलल्या जात आहे 

ग्रामपंचायत अंतर्गत रोजगार हमी योजनेचे काम चालू झाल्याच्या नंतर पंचायत समितीला मस्टर सादर करणे व त्याची मंजुरी घेणे काम उपलब्ध करण्यासाठी पंचायत समितीला ऑनलाइन करणे ऑनलाईन करत असताना सुद्धा शासन त्यांना ग्राम रोजगार सेवक म्हटले जाते आहे

ग्राम रोजगार सेवकाना दिवसातून दोन वेळेस सकाळी व संध्यकाळी हजारी घेतली जाते आम्हाला अर्धकालीन शासन म्हणते मस्टर भरणे मस्टर नेऊन पंचायत समितीला सादर करणे त्यांची त्याची एमबी करने मजुराच्या खात्या मध्ये बिल टाकणे अशी कामे करावी लागत आहे

Post a Comment

0 Comments