Header Ads Widget

राज्यातील विविध क्षेत्रातील सर्वच शासकीय कर्मचारी जुनी पेन्शन लागू करण्यात यावी म्हणून राज्याच्या संपावर !!

       माधव पवार 
महाराष्ट्र राज्यातल्या ईडी सरकानी राज्यातील विविध क्षेत्रातील शासकीय कर्मचारी सर्वच राज्याच्या संपावर गेली असल्यामुळे अनेक क्षेत्रातील कामे खोळंबत असून कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढून तात्काळ जुनी पेन्शन लागू करावे शासकीय कर्मचाऱ्याचे प्रामाणिक मत आहे

राज्यातील सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे सरकारने गांभीर्याने घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी ही जनसामान्य माणसातुन बोलल्या जात आहे

शासकीय कर्मचारी संपावर गेले असल्याने त्यांच्या मागण्या तात्काळ मार्गे लावावे जर शासन संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दुर्लक्ष करीत असल्यास राज्यात विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा संप तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांचा तात्काळ विचार करून त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात असे राज्यातील विविध क्षेत्रातील संपकर्याचे म्हणणे आहे

राज्यातील सर्वच शासकीय कर्मचारी संपावर गेले असल्यामुळे जनसामान्य माणसांचे महत्त्वाचे कामे खोळंबत असल्याने जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे

एकीकडे जनतेची बेहाल होते तर दुसरीकडे संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने सर्वच कर्मचारी जुने पेन्शन लागू करण्यात यावी म्हणून संपात गुंतले आहेत

 " दे रे हरी पलंगावरी म्हणणाऱ्या सरकारने "

शासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन लागू करून कर्मचाऱ्यांना शासनाने दिलासा द्यावा असे हे संपकरी कर्मचारी म्हणत आहेत संपकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्यास अधिकचा संप तीव्र करणार असल्याचे ही विविध क्षेत्रातील विविध कर्मचारी संघटनेच्या वतीने सांगण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments