नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातून म्हणजे मारताळा येथून गोदावरी पात्रातील अवैध रेतीचा उपसा करून नायगाव तालुक्यात विक्री करण्याचा धुमाकूळ वाजवणाऱ्या रेती माफियाच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे
बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांच्या आदेशानुसार नायगावचे कर्तव्यदक्ष तहसीलदार गजानन शिंदे व त्यांच्या पथकाने अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन हायवे व एक टिप्परवर दिनांक ९ मार्च २०२३ रोजी नायगाव ते नरसी रोडवर पहाटे सर्जिकल स्ट्राइक करून दमदार कारवाई केली असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या नरसी परिसरात व नायगाव परिसरात लोहा तालुक्यातील अवैध रेती गोदावरी पात्रातील उपसा करून चोरट्या मार्गाने विक्री करणाऱ्या वाळू माफियाच्या वहानावर नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी दमदार कारवाई करत सर्जिकल स्ट्राइक केले आहे
सदरची अवैध रेती असो की मुरूम अथवा गोदाकाठाची अवैध माती उत्कलन करण्याचा कोणी प्रयत्न केलास त्यांची कसल्याच प्रकारची गय केली नाही असा विचारा नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी दिला आहे
लोहा तालुक्यासह नायगाव तालुक्यात प्रशासनाच्या डोळ्यात धुळी फेकून रात्रंदिवस अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांच्या विरोधात नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी अंग झाडले असून अशाच पद्धतीने पुढे सुद्धा सर्जिकल स्ट्राइक करण्यात येईल असा इशारा त्यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना दिला आहे
या सदरच्या कारवाईत बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांच्या आदेशानुसार तहसीलदार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी कळकेकर, मंडळ अधिकारी कावळे तलाठी बामणीकर तलाठी कोकरे जिप चालक पुरी यांनी ही दमदार कारवाई केली आहे

0 Comments