Header Ads Widget

शिर्डीत रामनवमी ला कीर्तनासाठी दर्शन रांगेतून न सोडता बागेच्या गेटमधून सोडण्याची भक्ताची मागणी

विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे :-

रामनवमी उत्सवानिमित्त साईबाबा संस्थान शिर्डीच्या वतीने दरवर्षी साईबाबा मंदिरामध्ये कीर्तन ठेवले जाते. ते ऐकण्यासाठी भक्तांना दर्शन रांगेतून जाण्यास सांगण्यात येते. या रांगेतून कीर्तनाच्या ठिकाणी जाईपर्यंत कीर्तन संपून जाते. त्यामुळे बऱ्याच भक्तांना कीर्तनाचा लाभ घेता येत नाही.

त्यामुळे कीर्तनाच्या ठिकाणी जाण्यासाठी लेंडी बागेच्या गेटमधून सोडण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती नायगाव च्या साईभक्तांनी एका निवेदना द्वारे मंदिर समितीकडे केली  आहे.
  
नायगाव येथील साईभक्त व इतर ठिकाणा हुन येणाऱ्या साई भक्त यांची रामनवमीच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती असते.यातील बरीच भक्त मंडळी दर्शनासाठी येतात पण काही भक्त गण विशेषता नांदेड जिल्ह्यातील दासगणू पारंपारिक कीर्तन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येत आहेत

परंतु दर्शन रांगेतून कीर्तनाला जाई पर्यंत कीर्तन सपते या साठी उपरोक्त सुधारणा करीत लेंडी बागेतून जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणीनिवेदनाद्वारे संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे केली आहे.
  
निवेदनावर उपनगराध्यक्ष विजय  चव्हाण, ज्ञानेश्वर कवटीकवार, साईनाथ मेडेवार, मारुती कत्तुरवार, शंकर वडजे, आशिष मामीडवार आदींच्या स्वाक्षरी आहेत.प्रसंगी ही व्यवस्था नाही झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Post a Comment

0 Comments