Header Ads Widget

राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी महासंघ नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदी श्रीकृष्णा चौधरी यांची सर्वानुमते निवड !!


नागोराव शिंदे पळसपुरकर :- 

दिनांक ८ फेब्रुवारी २०२३ रोजी  परिचर्या प्रशिक्षण केंद्र नांदेड येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ यांची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली आहे

या बैठकी दरम्यान सर्वानुमते राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ शाखा नांदेडच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी श्रीकृष्णा पांडुरंग चौधरी यांची निवड करण्यात आली आहे 
या प्रंसगी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मा .जुनैद सलीम, जिल्हा लेखा व्यवस्थापक बाळासाहेब चौधरी, राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ राज्य सहसचिव तुळजाप्रसाद कुलकर्णी, अफरोज सौदागर, नंदिनी वडे, रेणुका शिरसाट, चैताली जाधव , गंगाधर कोंके, शंकर श्रृंगारे, बालजी अन्नदाते , माणिक गिर गावकर, सिध्दार्थ थोरात यांनी निवडी बदल सत्कार करण्यात आला आहे

आणि त्यांच्या निवडी बदल व पुढील कार्यास अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत 

Post a Comment

0 Comments