Header Ads Widget

बळेगाव बंधाराच्या पाण्याचा रुई परिसरातील शेतकऱ्यांना कधी फायदा होणार ? धरण उशाला आणि कोरड घशाला !!

       माधव पवार
नायगाव तालुक्यातील गोदावरी पात्रात बांधण्यात आलेल्या बळेगाव बंधाऱ्याच्या पाण्याचा रुई व रुई परिसरातील शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न काढण्यासाठी कधी फायदा होणार असा प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थितीत केला जात आहे

प्रशासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन बळेगाव बंधाऱ्याचे पाणी कोणत्या मार्गाने देता शेतकऱ्यांना देता येईल त्या पद्धतीने रुई परिसरातील शेतकऱ्यांना देण्यात यावे अशी मागणी या विभागातील शेतकऱ्यानी केली आहे
महाराष्ट्र शासनाने व राजकीय पुढार्‍यांनी बाभळी बंधार्‍याचा फायदा शेतकर्‍याच्या हितासाठी होईल म्हणून मोठ्या थाटात बंधा-याची निर्मिती केली परंतु; या बंधार्‍यातुन बळेगाव बंधार्‍याचे गेट उघडले की बळेगाव बंधार्‍याचे पाणी थेट बाभळी बंधार्‍यातुन आंध्रप्रदेशच्या दिशेने पळू लागल्यामुळे गोदावरी नदी पाणी असूनही कायम कोरडी राहत असल्याचे दिसून येत आहेया विभागातील शेतकऱ्यांच्या धरण उशाला आणि कोरड घशाला अशी गत निर्माण झाली असून गोदावरी शेतकऱ्यांना मात्र शेतीसाठी गोदावरीचे पाणी मिळत नसल्यामुळे शेतकरी उत्पन्नापासून वंचित तालुक्यातील रुई व रुई परिसरातील असून याच बळेगाव बंधाऱ्याचे पाणी कोलंबी परिसरातील शेतकऱ्यांना देण्यात आले आहे 

अतिशय महत्वाचे झाले परंतु  रुई बु भागातील शेतकऱ्यांना गोदावरी बंधाऱ्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे शेतकरी अनेक लागवडी पासून वंचित राहत आहे

तालुक्यातील रुई बु सावरखेड बळेगावच्या बऱ्याच पैकी शेतकऱ्यांना तसेच घुंगराळा, कृष्णुर, निळेगव्हाण, टाकळी सोमठाणा वंजारवाडी रुई खुर्द सातेगाव येथील अनेक शेतकऱ्यांना इज्जतगाव येथील सुद्धा अनेक शेतकऱ्याना पाणी मिळत नाही काही शेतकऱ्यांनी अगोदर स्वाताची पाईप लाईन करून शेतीला पाणी घेतले  असून शेकडो शेतकरी सदरच्या पाण्या पासून लांबच राहत असल्यामुळे शासनाने काही तरी पार्याय काढून या विभागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करण्याची गरज भासत आहे 

Post a Comment

0 Comments