महाराष्ट्र राज्याच्या नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सोनखेड येथील रहिवासी असलेले सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प अरविंद महाराज सोनखेडकर यांनी नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यासह पालकमंत्र्यांकडे मागणी केली आहेनायगाव तालुक्यातील रुई बु.येथील श्रीक्षेत्र सिद्धेश्वर देवस्थान पंढरपूर येथील आश्रमाच्या भव्य ठिकाणी अपंग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाळा मंजूर करून द्यावी अशी मागणी ह भ प सोनखेडकर महाराज यांनी केली आहे
सदरचे ठिकाण हे अतिशय भव्य असल्यामुळे व घुंगराची रुई बेळगाव रस्त्यावर हे देवस्थान असून नायगाव तालुक्यातील रुई बु या ठिकाणी तालुक्यातील अनेक ठिकाणचे अपंग विद्यार्थी मुले व मुलीना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी जर राजकीय पुढाऱ्यासह प्रशासनाने लक्ष दिले तर अपंग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा फायदा होणार आहे
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्याच्या सोनखेड येथील रहिवाशी असलेले प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प अरविंद महाराज सोनखेडकर गेल्या अनेक वर्षापासून रुई बु येथे शिवरात्रीच्या महिन्यात सत्याच्या कार्यक्रमा निमित्त गावकऱ्यांनी त्यांना निमंत्रित करत आहेत
तर या ठिकाणी नक्कीच शाळेला मान्यता मिळेल अशी ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली असून सदरची शाळेला मान्यता मिळून घेण्यासाठी महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प अरविंद महाराज सोनखेडकर यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे ही सांगितले आहे

0 Comments