Header Ads Widget

गेल्या पस्तीस वर्षा पासून काँग्रेस पक्षाशी संबंध असलेल्या भास्करराव धर्माधिकाऱ्याना भारत जोडो यात्रेच्या दरम्यान खा. राहुल गांधींना भेटण्यासाठी पास नाकारली -? - धर्माधिकारी

      माधव पवार
गेल्या ३० ते ३५ वर्षाखाली काँग्रेस पक्षाचे सुजळ नेतृत्व असलेले स्वा. शंकरराव चव्हाण यांना कै. मोहनराव धर्माधिकारी बरबडेकर यांनी नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या काहळा येथून शंकराव चव्हाण यांना घोड्यावर बसून बरबडा येथे आणले होते बरबड्यामध्ये आगमन झाल्याच्या नंतर कै.मोहनराव धर्माधिकारी यांनी बरबडा गाव वासियाच्या साक्षीने गावात बैलगाडीला सजवून गावातून मिरवणूक काढण्यात आली होती

अशा निष्ठावंत काँग्रेस पक्षाच्या नेत्याचे चिरंजीव भास्करराव मोहनराव धर्माधिकारी बरबडेकर यांना भारत जोडो यात्रे दरम्यान काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना भेटण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पुढाऱ्यानी व तालुका अध्यक्षांनी पास नाकारली असल्याचा आरोप भास्करराव धर्माधिकारी बडबडेकर यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे

तालुक्यातील बरबडा येथील रहिवासी असलेले भास्करराव धर्माधिकारी यांनी गेल्या पस्तीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचे काम करीत असताना सुद्धा ह्या नेते मंडळी कडून खासदार राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेच्या दरम्यान गांधींना भेटण्यासाठी पासची मागणी केली होती परंतु काँग्रेस पक्षाचे नायगाव तालुका अध्यक्ष संभाजीराव भिरवंडे यांच्यासह पुढाऱ्यानी मला पास दिला नसल्याची खंत व्यक्त करीत आरोप व्यक्त केला  आहे

गेल्या तीस व पस्तीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचे काम एकनिष्ठेने करत आलो आणि यापुढे ही महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारे काम करणार असल्याचे ही भास्करराव मोहनराव धर्माधिकारी बरबडेकर यांनी सांगितले असून ही सदरची बाब माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना भेटून सांगणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे 


Post a Comment

0 Comments