Header Ads Widget

कृषिमंत्री अब्दुल सत्तार याची मंत्त्री मंडळातुन हाकालपट्टी करण्यात यावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्यासह वसंत पाटील सुगावे यांची मागणी



      माधव पवार 
नांदेड:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खा. सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून  हाकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर  यांनी केली आहे 
दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ रोजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली असल्यामुळे त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे नेतृत्वाखाली निषेध व्यक्त करण्यात आला आहे
नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारून सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध केला यावेळी सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून सत्तार यांच्यावर पोलीस कार्यवाही करून सत्तार यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करा अशी मागणी करण्यात आली. यानंतर शिवाजी नगर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन सत्तार यांच्यावर पोलीस कार्यावही करावी याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आले
यावेळी माजी सभापती भगवानराव आलेगावकर, डी. बी. जांभरूणकर,वसंत सुगावे पाटील, सुभाषराव गायकवाड गजानन पापंटवार प्रांजली रावणगावकर धनंजय सूर्यवंशी रमेश गांजापूरकर अजिंक्य देशमुख डॉ मुजाहिद खान गफारखान बालाजीराव शेळके डॉ विक्रम देशमुख विश्वनाथ बडूरे डॉ उत्तमराव सोनकांबळे आदी उपस्थित होते 
राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते प्रकाश मांजरमकर अभिजीत मुळे जि प सदस्य विजय धोंडगे रेखा राहिरे प्रेमकुमार कौसल्ये श्रीकांत मांजरमकर माधवराव पवार बाबूराव हंबर्डे सुभाष भोसले नारायण शिंदे बालासाहेब मादसवाड उत्तमराव आलेगावकर यशोदा शेळके पूजाताई व्यवहारे अनमोलसिंग कामाठेकर मकसूद पटेल बालाजी बोकारे शिवाजीराव जाधव,एम. डी. बनसोडेसह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते 

रामदास पाटील जाधव बालाजीराव माटोरे भगवान बंडे कुसुम देशमुख गंगासागर खंदारे दिपमाला कंधारे ज्योती पेटकर बालाजी बोकारे सुभाषराव रावणगावकर यांच्यसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक  कार्यकर्ते उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments